खेडमध्ये बोरजे, निगडे गावाच्या परिसरात वणवा

January 18, 2012 10:07 AM0 commentsViews: 170

18 जानेवारी

खेड तालुक्यात बोरज आणि निगडे गावातील परिसरात दुपारी बाराच्या सुमाराला वणवा लागला. हा वनवा अद्यापही आटोक्यात आलेला नाही. गेल्या सात तासापासून हा वनवा धगधगतोय आता पर्यंत सुमारे 500 ते 600 एकर जमिनीवरील आंबा काजूची कलमे तसेच खैराची कलमे जळून खाक झाली आहेत. जवळ जवळ 3 ते 4 हजार कलमे रोजगार हमी योजने अंतर्गत ही कलमे लावण्यात आली होती. वनवा लागलेल्या जागेपैकी 100 जमीन ही जनावरांसाठी कुरण म्हणून होती. ते सुद्धा भस्मसात झालंय.

त्याच प्रमाणे या परिसरात शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागती साठी ठेवण्यात आलेल्या पेंड्याही या वनव्यात जळून खाक झाल्या आहेत. या वणव्या मुळे अंदाजे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा वणवा हेदली आणि सवेनी या गावाच्या दिशेनं पेटत चाललेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पर्यंत कोणतीही शासकीय अधिकारी घटना स्थळी आलेला नाही. मोठ्या प्रमाणात वणवा लागण्याची ही खेडमधील दुसरी घटना आहे. या आधी कुडोशी गावात देखील अशाच प्रकारे मोठा वनवा लागला होता. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍याचं नुकसान झालं होतं.

close