ठाण्यात आ.भोईर यांचा राष्ट्रवादीला रामराम

January 19, 2012 8:56 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी

ठाण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला फटका बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करुन राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर आज राष्ट्रवादीलाच राम राम ठोकला आहे. भोईर यांनी आता 'जय महाराष्ट्र'चा झेंडा खांद्यावर घेतला असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भोईर हे राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषद सदस्य असून ते आज आपला राजीनामाही देणार आहे. यानंतर त्यांचा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचं भोईर यांचं म्हणणं आहे. भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाण्यातील नगरसेवक हरिष वैतीही सेनेत प्रवेश करणार आहे. या प्रवेशनाट्यामुळे ठाण्यातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

close