राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांचा काँग्रेसला रामराम

January 18, 2012 2:12 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी

सिंधुदुर्गमधील नारायण राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राणेंना थेट विरोध करण्यासाठीच काँग्रेसने आपला वापर करून घेतला असा आरोप त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केला. येत्या 22 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत सावंत राष्ट्रवादीत दाखल होणार असून जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये सावंत यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीकडून कबूल करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे सावंत यांचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

close