नाशिकजवळ मालगाडी घसरली ; रेल्वे वाहतूक ठप्प

January 19, 2012 8:18 AM0 commentsViews: 5

19 जानेवारी

नाशिक : इगतपुरीजवळ पाडळी स्टेशनला मालगाडीचे 20 कंटेनर रुळावरुन खाली घसरले आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण याचा परिणाम मुंबईकडे येणार्‍या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मध्येच थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पंजाब एक्सप्रेस आहे. ही गाडी ओढा स्टेशनजवळ थांबवण्यात आली आहे. सेवाग्राम एक्सप्रेस निफाडजवळ थांबवली आहे. जनशताब्दी मनमाडजवळ थांबवण्यात आली आहे. तर पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

close