गिलानी यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

January 19, 2012 10:25 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आता 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात आज आपला युक्तीवाद मांडला. राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी आपण कधीच कोर्टाचा अनादर केलेला नाही, तसं करण्याचा आपण विचारही करू शकत नाही असा युक्तीवाद गिलानी यांनी केला.पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू करावेत असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. हे आदेश न पाळल्याने गिलानी यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. झरदारी राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर मग त्यांच्यावर खटल्याचा विचार होऊ शकतो, असंही गिलानी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या घटनेतल्या कलम 248 चा आधार घेत गिलानींनी युक्तिवाद मांडला.

close