म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचे निधन

January 19, 2012 2:05 PM0 commentsViews: 3

19 जानेवारी

हिंदी सिनेमांचे संगीतकार आणि म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचं गोव्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मधुमती, दो बिघा जमीन, भाभी की चुडियाँ, महल, प्यासा अशा अनेक सिनेमांचे ते म्युझिक ऍरेंजर होते. संगीतकार प्यारेलाल त्यांचे ते गुरू होते. त्यांना आदरांजली म्हणून अमर अकबर अँथनी या सिनेमात अँथनी गोन्साल्विस ही व्यक्तिरेखा घेतली गेली होती. भारतीय सिनेमाचे ते पहिले म्युझिक अँरेंजर होते. एसडी बर्मन, पंकज मलिक, आर सी बहल, सलिल चौधरी अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं.

close