कलमाडींची जेलमधून सुटका

January 19, 2012 2:40 PM0 commentsViews: 6

19 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी तब्बल 9 महिन्यांनी सुरेश कलमाडी अखेर आज तिहारबाहेर आले. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी 26 एप्रिल 2011 ला त्यांना अटक झाली होती. ट्रायल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कलमाडींनी दिल्ली हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. 2 जी घोटाळ्यातल्या आरोपींना जामीन देताना सुप्रीम कोर्टाने जामीन हा नियम आहे आणि जेल हा अपवाद आहे असं म्हटलं होतं. त्याच्या आधारावर कलमाडींमानी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

दिल्ली हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. संध्याकाळी रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला कलमाडी तिहारच्या बाहेर आले. आणि पण त्यांनी मीडियाला हुलकावणी दिली आणि आपल्या दिल्लीतल्या घरी गेले. अखेर त्यांच्या दिल्लीतल्या घराबाहेर मिडियानं कलमाडींना गाठलंच.सुरेश कलमाडींच्या सोबत व्ही. के भानोत यांनादेखील दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडींना जामीन मिळाल्याने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आता खरा रंग भरणार असल्याचं मानलं जातंय. स्वीस टाईम्स ओमेगाला दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 95 कोटींचे नुकसान झाल्याप्रकरणी कलमाडींना गेल्या वर्षी 26 एप्रिल रोजी अटक झाली होती. गेल्या जूनमध्ये ट्रायल कोर्टाने कलमाडींची जामीन याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. कलमाडींना जामीन मिळाल्यामुळे आता ललीत भानोत आणि जयचंद्रन या आणखी दोन आयोजन समितीच्या माजी अधिकार्‍यांनी जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली.

कलमाडींवर आरोप – टाईम किपिंग मशीनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आर्थिक घोटाळा- लंडनमध्ये क्विन्स बॅटन रिलेमध्ये आर्थिक घोटाळा- भारतीय उच्चायुक्तालयातून ई-मेलची फेरफार- ट्रेडमिल्ससारखी उपकरणं बाजारभावापेक्षा जास्त रकमेला खरेदी- मोठं कमिशन घेऊन मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट्स दिले- CWGचं बजेट प्रमाणाबाहेर वाढवलं

कलमाडींना जामीन मिळाल्याची बातमी येताच पुण्यात कलमाडींच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. फटाके फोडून कलमाडींच्या समर्थकांनी जल्लोष केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पण या जल्लोषावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली कलमाडींनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणेकरांनी केली. दरम्यान, कलमाडींच्या सुटकेचा काँग्रेसमध्ये आनंदोत्सव नाही आणि काँग्रेसच्या प्रचाराची धुरा कलमाडींकडे दिली जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

close