आयोग बजावणार राज यांना नोटीस ?

January 18, 2012 4:03 PM0 commentsViews: 19

18 जानेवारी

निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टिकेचा भडिमार सुरू केला आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करु नये, असं राज ठाकरे काल म्हणाले होते. आज त्यांनी निवडणुकाचं आयोगाचं लोणचं घालायचं का, या शब्दात आयोगावर तोफ डागली आहेत. त्यांच्या या टीकेची गंभीर दखल आता निवडणूक आयोगाने घेतली आहे. या वादग्रस्त वक्तव्याबाबत निवडणूक आयोग राज यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोग राज यांना नोटीस बजावण्याचा विचार करतंय, अशी खात्रीलायक माहिती आयबीएन-लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करु नये, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी काल मंगळवारी केला. राज यांची ही टीकेवरुन चर्चा थांबत नाही तीच राज यांनी आज पुन्हा निवडणूक आयोगावर तोफ डागली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. याप्रकरणी अजितदादांच्या दिलगिरी व्यक्त केल्यामुळे आयोगाने क्लिन चीट दिली. यावर राज यांनी, अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आयोगाने त्यांना सोडलं कसं ? उद्या मी सुध्दा अशी चूक करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आयोग मला सोडले का ? अशा आयोगाचं काय लोणचं घालायचं का ? असा वादग्रस्त सवाल राज यांनी उपस्थित केला. आता त्यांच्या या टीकेची गंभीर दखल आता निवडणूक आयोगाने घेतली आहे. या वादग्रस्त वक्तव्याबाबत निवडणूक आयोग राज यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोग राज यांना नोटीस बजावण्याचा विचार करतंय, अशी खात्रीलायक माहिती आयबीएन-लोकमतला मिळाली आहे.

close