मालेगाव बॉम्बस्फोट ही हिंदूची प्रतिक्रिया – अभय वर्तक

November 20, 2008 3:36 PM0 commentsViews: 42

20 नोव्हेंबर, मुंबई विनय म्हात्रे मालेगावात झालेले बॉम्बस्फोट हे साध्वी आणि कर्नल पुरोहित यांनी केले असतील आणि जर हे सिद्ध झालं तर ही देशातल्या 80 टक्के हिंदूंकडून आलेली प्रतिक्रिया आहे, असं समजावं, असं सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. सनातन संस्थेनं साध्वी आणि कर्नल पुरोहित यांचं समर्थन केलं आहे. सरकारनं या प्रकरणात नीट अभ्यास करावा, आरोप सिद्ध होईपर्यंत ही मंडळी निरपराध आहेत, असंही सनातन संस्थेनं म्हटलं आहे. सनातन संस्थेचं प्रवक्ते अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. सनातन संस्थेच्यावतीनं सरकारच्याविरोधात राज्यभर दिंड्या काढण्यात येणार आहेत.

close