मुंबईमध्ये 3 जणांचा बळी टीबी टीडीआरमुळे नाही !

January 18, 2012 5:40 PM0 commentsViews: 9

18 जानेवारी

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात टोटल ड्रग रेझिस्टंन्सचे तब्बल 12 पेशंट्स आढळल्याचा दावा हिंदूजा हॉस्पिटलने केला होता. टीडीआर टीबीचे आणखी दोन पेशंट्स जेजे हॉस्पिटलमध्येही आढळले होते. तर 3 रुग्णांचा यामुळे बळी गेला असंही समोर आलं. पण राज्य सरकार आणि बीएमसीच्या आरोग्य अधिकार्‍यांनी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा टीबी टीडीआर प्रकाराचा नसल्याचा दावा केला. हा टीबी एक्स्ट्रा एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंन्स म्हणजेच एक्सएक्स डीआर (XXDR) प्रकाराचा असल्याचंही या आरोग्य अधिकार्‍यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केलंय.

2006 पासून भारतात एसडीआर (SDR) किंवा एक्सडीआर (XDR) चे पेंशंट्स आढळले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची यंत्रणाही तयार करण्यात आलेय. मुंबईकरांनी चिंता करण्याचे कोणतंही कारण नाही. घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. एक्सएक्स डीआर टीबीचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासनही महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिलं. टीबीच्या सर्व पेशंट्सकडे लक्ष देण्यासाठी वॉर्डनिहाय नोडल ऑफिरर्सचीही नेमणूक केली जाईल असं म्हैसकर यांनी स्पष्ट केलं.

टीडीआर टीबी म्हणजे काय ? – रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते- शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं- प्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे रुग्ण औषधाला प्रतिसाद देत नाही- संसर्गजन्य आजाराला बळी पडण्याचा धोका – ऑक्सिजन पातळी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली तर रुग्ण हळुहळु उपचाराला प्रतिसाद देऊ लागतो

टीडीआर टीबी का होतो ? – अनियमित किंवा चुकीचे उपचार- अनियमित आणि चुकीच्या औषधांचा मेंदूसह इतर अवयवांवर परिणाम – पेशंट्सची प्रकृती खालावत जातेटीडीआर टीबी म्हणजे काय ? – MDR – मल्टिपल ड्रग रेझिस्टन्स- SDR- सेकंडरी ड्रग रेझिस्टन्स- XDR- एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टन्स- TDR- टोटल ड्रग रेझिस्टन्स

close