कलमाडींविरुध्द खटल्याची माहिती द्या : ऑलिम्पिक समिती

January 21, 2012 4:30 PM0 commentsViews: 4

21 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणात आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनंही लक्ष घातलं आहे. सुरेश कलमाडी यांच्या विरुद्धच्या खटल्याची सद्यस्थिती सांगा, अशी मागणी आयओसी (IOC)नं भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे केली आहे. दरम्यान, कॉमनवेल्थ घोटाळ्यातल्या आणखी काही आरोपींना आज कोर्टाने दिलासा दिला. कॉमनवेल्थ आयोजन समितीचे माजी सरचिटणीस ललित भानोत आणि माजी खजिनदार एम जयचंद्रन यांना दिल्लीतल्या कोर्टाने आज जामीन मंजूर केला. त्यांना प्रत्येकी 5 आणि 2 लाखांच्या हमीवर जामीन देण्यात आला आहे. सुरेश कलमाडींना जामीन मिळाल्यानंतर या भानोत आणि जयचंद्रन यांनी जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती.

close