निवडणुकीसाठी उमेदवारांनी बनवले चक्क जातीचे बनावट प्रमाणपत्र

January 21, 2012 9:49 AM0 commentsViews: 11

21 जानेवारी

पुणे आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील बरेचशे प्रभाग आरक्षित झाल्याने महानगरपालिका निवडणुकीकरीता इच्छुक असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी चक्क जातीचे बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. ओ. बी. सी साठी आरक्षित असलेल्या प्रभागावर डल्ला मारण्याचा प्रयत्न मराठा समाजातील लोकांनाकडून होत असल्याचा आरोप ओ. बी. सी संघर्ष समितीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी केला आहे. कृष्णकांत कुदळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या जात पडताळणी विभागातून मिळवलेल्या माहितीप्रमाणे 89 मराठा समाजातील उमेदवारांनी कुणबी जातीचा प्रमाणपत्र मिळवला आहे. त्यामुळे निवडणूक फार्म स्विकारताना ते काळजीपूर्वक तपासण्यात यावे अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना ओ. बी. सी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

close