आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा संघटनांमध्ये फूट

November 20, 2008 3:39 PM0 commentsViews: 3

आशिष जाधव 20 नोव्हेंबर, मुंबई मराठा समाजाचा ओबीसी वर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सर्व मराठी संघटनांचे नेते एकत्र आले होते. पण मराठा आरक्षण निर्णायक टप्प्यावर असतानाच मराठा संघटनांमध्ये फूट पडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायकराव मेटे आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत आहेत, असा आरोप करीत अखिल भारतीय मराठा महासंघानं आंदोलनातून अंग काढून घतलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आयोजित केलेल्या मराठी आरक्षण परिषदेचा पुरता फज्जा उडालाय. याबाबत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी अधिक माहिती दिली. ' 93 सालापासून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील होता. जून 2004 मध्ये समाजाला 70 टक्के आरक्षण देण्यात आम्ही यशस्वी ठरलोय. पण उर्वरित आरक्षण मिळवत असताना राजकीय व्यक्ती हे आंदोलन स्वत:भोवती केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला जातोय ', असं कोंढरे म्हणाले.

close