कलमाडींचा राष्ट्रवादीला फरक पडणार नाही – अजितदादा

January 21, 2012 12:04 PM0 commentsViews: 6

21 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये फटाके फोडणे हे पुणेकरांना कमीपणा आणणारं आहे, पुणेकर हे खपवून घेणार नाही या शब्दात अजित पवार यांनी कलमाडी समर्थकांवर टीका केली. कलमाडी यांच्या सुटकेचा राष्ट्रवादीला कसलाही फरक पडणार नाही या अगोदर ते प्रचारात होते तेव्हा काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला होता याची आठवणही त्यांनी करु दिली.

close