शरद पवारांना नैतिकता का आठवली नाही – संजय राऊत

January 22, 2012 11:00 AM0 commentsViews: 3

22 जानेवारी

आनंद परांजपे यांच्या बंडानंतर ठाण्यात काल शिवसेनेचा मेळावा झाला. आनंद परांजपे यांच्या राष्ट्रवादीच्या आश्रयाचे पडसाद या मेळाव्यावर होते. सर्वच शिवसेना नेत्यांनी आनंद परांजपेंवर कठोर शब्दात टीका केली. दोन वेळा खासदारकी देवूनही फक्त स्वार्थासाठीच आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेले अशी टीका यावेळी करण्यात आली. तर दुसर्‍याला नैतिकतेच्या गप्पा शिकवणार्‍या शरद पवारांना आनंद परांजपेंना पक्षात घेताना नैतिकता का आठवली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच आनंद परांजपे गेल्यामुळे शिवसेनेला कोणताही तोटा नाही ठाण्यात सेनेची भींत अभेद्द आहे आणि ती कायम राहील असा दावाही राऊत यांनी केला.

close