विठ्ठल मूर्तीला ‘एमसील’ लावल्याचे उघड

January 21, 2012 1:35 PM0 commentsViews: 120

21 जानेवारी

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीवर संरक्षक लेप लावण्यासाठी औरंगाबादमधील पुरातत्वविभागाच्या तज्ञाच्या पथकाने काल मूर्तीची पाहणी केली. याचा अहवाल ते मंदिर समितीला देणार आहेत. पुरातत्व खात्याचे उपाधिक्षक एम.आर.सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पाहणी करून काही सुचनाही मंदिर समितीला केल्या आहेत. या पाहणीमध्ये मूर्तीला काही ठिकाणी 'एमसील' लावल्याचं आढळलं अशी माहितीही त्यांनी दिली. असं करणं गरजेचं नव्हतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मंदिर समितीने आम्हाला सांगितल्यास मूर्तीला संरक्षक लेप देण्यास आम्ही तयार असल्याचही त्यांनी सांगितलं.

मंदिर समितीला केलेल्या सूचना- पुजेत दह्याचा वापर नको- गाभार्‍यात 24 तास एसी- गाभार्‍यात अल्ट्राव्हायलेट फ्रि लाईट लावणे- गाभार्‍यात पांढर मार्बल न लावता काळं मार्बल लावणे- गाभार्‍यात एक्झॉष्ट फॅन बसवणे

close