पुणेकरांना संगीताची मेजवानी

January 21, 2012 1:42 PM0 commentsViews: 6

21 जानेवारी

पुण्यात कालपासून 5 व्या वसंतोत्सवाला सुरवात झाली आहेत तीन दिवस चालणार्‍या या वंसतोत्सवात संगीताची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहेत. यंदा वसंतोत्सावाचे उद्घाटन रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या गझल गायनाने झाली. तसेच रशिद खान आणि उस्ताद शाहिद परवेझ सतार यांच्या जुगलबंदीचा आस्वादही पुणेकरांनी घेतला. तर आज वसंतोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी स्वपन चौधरी यांचं तबलावादन आणि अमेरिकन सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स, बासरीवादन आणि राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाचं फ्युजन रंगणार आहे. तर उद्या तिसर्‍या दिवशी निलाद्री कुमार यांचे सितार वादन पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे. वसंतोत्सवाचा शेवट पंडित राजन-साजन मिश्रा यांच्या परफॉर्मन्सनं होणार आहे. या सांगितीक मेजवानीशिवाय यंदा पंडित अरविंद थत्ते अनिश प्रधान आणि यंग टॅलेन्ट मयूर महाजन यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

close