एसटी – कारच्या टक्करीत 5 ठार

January 22, 2012 11:34 AM0 commentsViews: 3

22 जानेवारी

मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात खारपाले गावाजवळ आज झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जीव गेला. एसटी आणि इंडिकामध्ये समोरा समोर झालेल्या टक्करीत इंडिकामधील सर्व पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी मुलुंडमधील रहिवासी होते. यामध्ये दिनेश पाटील (26), सुरेश पाटील (27), रविंद्र लाड (40), रविंद्र शिवणकर( 32) भांडुप, अनिल सावंत 43 काळाचौकी, हे सर्व प्रवासी महाडला चालले होते. तर एस टी दापोली वरुन मंुबईला जात होती. समोरा समोर झालेली टक्कर इतकी भीषण होती की यात कारचा संपूर्ण चुराडा झाला. या अपघातातील जखमींना पेणच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close