राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात – शरद पवार

November 20, 2008 3:42 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, औरंगाबाद संजय वरकड राज्य मंत्रिमंडळाचा पुढीस आठवड्यात विस्तार होईल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे. औरंगाबाद इथे पवारांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसआणि काँग्रेसच्या वाट्याची प्रत्येकी तीन अशा सहा जागा रिकाम्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईचे नवाब मलिक, जळगावचे सतीश पाटील, अकोल्याचे सुभाष ठाकरे यांची नावं संभाव्य यादीत आहेत. सध्या नगरविकास राज्यमंत्री असलेले राजेश टोपे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पुण्याचे बाळासाहेब शिवरकर, कोल्हापूरचे पी. एन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नागपूरचे नितीन राऊत किंवा मुंबईतले जनार्दन चांदूरकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

close