परांजपेंचा विषय कालच संपला – सरनाईक

January 21, 2012 1:49 PM0 commentsViews: 6

21 जानेवारी

खासदार आनंद परांजपे यांच्यासंदर्भात मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. याबैठकीत ठाण्यातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीला ठाण्यातले शिवसेनेचे सर्व नेते हजर होते. आनंद परांजपे हे केवळ चेहरा होते अशी टीका आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. आनंद परांजपे कधीच कार्यकर्ते नव्हते. त्यांचा विषय कालच संपलाय असा उपरोधिक टोलाही सरनाईक यांनी हाणला. तर ठाण्यात शिवसैनिकांचं मनोधर्य उंचावण्यासाठी सध्या मेळावा होणार आहे या मेळाव्याला खासदार संजय राऊत येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

close