राफेलनं गाठली ऑस्ट्रेलियन ओपनची क्वार्टर फायनल

January 22, 2012 11:45 AM0 commentsViews:

22 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालने स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठली आहे. प्रतिस्पर्धी फेलिसियानो लोपेझचा त्याने 6-4, 6-4 आणि 6-2 अशा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. नदालला या स्पर्धेत गुडघ्याचा त्रास जाणवतोय आणि प्रत्येक मॅचमध्ये नी कॅप घालूनच तो खेळला. पण पहिल्या तीन मॅच त्याने आरामात जिंकल्या होत्या. पण आज मात्र डेव्हिस कप टीममधला त्याचा साथीदार लोपेझने त्याला चांगला प्रतिकार केला. ही मॅच अडीच तास चालली. पण नदाल चॅम्पियनच्या थाटात खेळला आणि मोक्याच्या क्षणी लोपेझची सर्व्हिस ब्रेक करत त्याने महत्त्वाचे गेम जिंकले आणि मॅचही. आता क्वार्टर फायनमध्ये त्याचा मुकाबला चेक रिपब्लिकच्या थॉमस बर्डीचशी होणार आहे.

तर महिलांमध्ये माजी चॅम्पियन किम क्लाईस्टर्सनेही स्पर्घेची क्वार्टर फायनल गाठली. पण चौथ्या राऊंडमध्ये चीनच्या ली नाने तिला कडवा प्रतिकार केला. पहिला सेट क्लाईस्टर्सने गमावला आणि दुसर्‍या सेटमध्येही टायब्रेकरवर ती 1-4 ने मागे होती. पण टायब्रेकरपासून लीचा खेळ थोडाफार घसरला. आणि त्याचा फायदा उचलत क्लाईस्टर्सने दुसरा सेट जिंकत मॅचमध्ये कमबॅक केलं. तिसर्‍या सेटमध्ये ती 5-1ने आघाडीवर होती. पण लीने पुढे दोनदा तिची सर्व्हिस ब्रेक करत मॅचमध्ये पुन्हा कमबॅक केलं. पण अखेर दहाव्या गेममध्ये स्वत:ची सर्व्हिस राखत क्लाईस्टर्सने ही मॅच जिंकली. लीचा तिने 4-6, 7-6 आणि 6-4 असा पराभव केला.

close