टीम अण्णांवर फेकला बूट

January 21, 2012 3:57 PM0 commentsViews: 3

21 जानेवारी

अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर डेहराडूनमध्ये बूट फेकण्याची घटना घडली. उत्तराखंडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम अण्णांचा दौरा सुरू आहे. त्यांची आज डेहराडूनमध्ये पहिलीच सभा होती. केजरीवाल स्टेजकडे जात असताना त्यांच्यावर बूट फेकण्यात आला. मात्र हा बूट कोणाला लागला नाही. बूट फेकणार्‍याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलं. त्याचं नाव किशन लाल असल्याचं समजतंय. मात्र टीम अण्णांनी माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि नियोजित ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पाडला.

close