साध्वीच्या मुद्यावरुन अडवाणींनी घेतली पंतप्रधानांची भेट

November 20, 2008 3:44 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, दिल्लीमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी आणि प्रज्ञासिंगच्या प्रकरणावरून आज भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी एटीएसकडून साध्वी प्रज्ञासिंग आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला त्रास दिला जात असल्याचं सांगितलं. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती अडवाणी यांनी केली. एटीएस त्यांचं काम करत असून कुणालाही जाणूनबुजून त्रास दिला जाणार नाही, असं पंतप्रधानांनी अडवाणींना सांगितलं.

close