भारत भेटीवर येऊ नये यासाठी पोलिसांचा होता कट – रश्दी

January 22, 2012 5:17 PM0 commentsViews: 5

22 जानेवारी

भारतीय वंशाचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्या भारत भेटीवरुन रोज नवीन वाद निर्माण होत आहे. अंडरवर्ल्ड माफियांकडून जिवाला धोका असल्याची माहिती मिळाल्यामुळे रश्दी यांनी आपला जयपूर दौरा रद्द केला होता. पण जयपूर पोलिसांनी आपल्याला खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप रश्दी यांनी केला. आपण भारत भेटीवर येऊ नये, यासाठी जयपूर पोलिसांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे अतिशय संतापल्याचे त्यांनी ट्विटरवरुन कळवलं आहे.

close