नाट्यसंमेलनात दोन मित्रांची अनोखी भेट

January 22, 2012 5:27 PM0 commentsViews: 2

22 जानेवारी

सांगलीत सुरु असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची आज सांगता झाली. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांची भेट घेण्यासाठी एक खास पाहुणासुद्धा आला होता. नाट्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी अनेक मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचीही प्रकट मुलाखत सुरु होती. पण मुलाखत सुरु असताना अचानक एक पाहुणा स्टेजवर आला आणि त्याला बघून स्वत: मोघेच आश्चर्यचकीत झाले. हे होते निळकंठ शिरगावकर… शिरगावकर हे मोघेंचे अतिशय जुने मित्र आणि कोल्हापुरातील नाट्यकलाकार आहेत. त्यांचं वय आहे 101 वर्ष… या 101 वर्षाच्या मित्रानं मोघेंसाठी खास भेटही आणली होती. आपल्या जुन्या मित्राला बघून श्रीकांत मोघेही भावनिक झाले. त्यांनी शिरगावकरांचा सत्कार केला. यावेळी शिरागवकरांनी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. या सुखद धक्क्याच्या आठवणी घेऊन मग दोघांनी एकमेकांना निरोप दिला.

close