रणजीत राजस्थानला सलग दुसर्‍यांदा जेतेपद

January 23, 2012 4:32 PM0 commentsViews: 2

23 जानेवारी

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत राजस्थान टीमने सलग दुसर्‍यांदा जेतेपदाचा मान पटकावला आहे. घरच्या मैदानावर तामिळनाडूला पराभव स्विकारावा लागला आहे. पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या भक्कम आघाडीच्या जोरावर राजस्थानने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. चेन्नईच्या चिंदमबरम मैदानावर झालेल्या फायनलमध्ये राजस्थानने पहिल्या इनिंगमध्ये 621 रन्सचा डोंगर रचला. बलाढ्य स्कोरसमोर तामिळनाडू टीम दबावाखाली खेळली. दिनेश कार्तिकने एकाकी झुंज देत 150 रन्स केले पण त्याला इतर बॅट्समनची साथ लाभली नाही. आणि तामिळनाडूची पहिली इनिंग अवघ्या 295 रन्सवर ऑलआऊट झाली. राजस्थानच्या रितुराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसर्‍या इनिंगमध्ये राजस्थानने 294 रन्सवर इनिंग घोषित केली. याला उत्तर देताना तामिळनाडूला दुसर्‍या इनिंगमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यात 8 रन्स करता आले.

close