फलज्योतिषाच्या नादात पत्नीसह 2 चिमुरड्याना विष देवून संपवले

January 23, 2012 10:06 AM0 commentsViews: 2

23 जानेवारी

पुरोगामी राज्याचं बिरुद मिरवणार्‍या महाराष्ट्राच्या नावाला पुन्हा एकदा काळीमा फासणारी घटना घडली आहे. फलज्योतिषाच्या नादाने संपूर्ण कुटंुबालाच विष देवून संपवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात उघडकीस आला आहेत. धायरीमधील समर्थ वंदन सोसायटीत राहणार्‍या अरुण पालकर यांनी आपली पत्नी, दोन लहान मुले यांना विष दिलं. या घटनेत दोन चिमुकल्यांसह, पत्नीचा मृत्यू झालाय तर अरुण पालकर सध्या मृत्युशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आमच्या पत्रिकेत शनी, मंगळ असल्यामुळे आतापर्यंत बराच त्रास सहन करावा लागत असून व्यवसायामध्ये नुकसान होत आहे. भविष्यातही शनी, मंगळाच्या वक्र दृष्टीचा त्रास होणार आहे त्यामुळे विष घेतल्याचं आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. अरूण पालकर यांना स्वतः पत्रिका पहायचा नाद लागला होता त्यातून हा प्रकार घडला.

close