राहुल गांधींवर भिरकावला जोडा

January 23, 2012 5:00 PM0 commentsViews: 5

23 जानेवारी

निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत आणखी एक जोडे मारण्याची घटना घडली आणि यावेळी जोडे फेकण्याचा प्रकार घडला तो राहुल गांधींच्या सभेमध्ये..उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये राहुल गांधींची सभा होती. त्यांचं भाषण सुरु असताना गर्दीतल्या एका इसमाने जोरजोरात घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर जोडा फेकला. त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक केली. पण अशा घटनांमुळे आपल्या प्रचारात कोणताही अडथळा येणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

close