गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मिल्खासिंग यांच्या बूटाचा लिलाव

January 23, 2012 5:04 PM0 commentsViews: 18

23 जानेवारी

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खासिंग आपले रोम ऑलिम्पिकमध्ये वापरलेले बूट मदतिनधीच्या लिलावासाठी देणार आहेत. रोम ऑलिम्पिकमध्ये हेच बूट घालून मिल्खा धावले होते. आणि ब्राँझ मेडलसाठी त्यांना अक्षरश: काही दशांश सेकंद कमी पडले होते. शिवाय ऑलिम्पिक आधी फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत प्राथमिक फेरीत त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डही केला होता. अशी ही अमूल्य ठेव गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी देऊ केली आहे. बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने सेलिब्रिटींच्या वस्तूंचा लिलाव करुन उभारलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा उपक्रम सुरु केला आहे. याच उपक्रमात पुढच्या महिन्यात मिल्खासिंग यांच्या बूटांचाही लिलाव होणार आहे.

close