छत्तीसगडमध्ये दुसर्‍या टप्प्यात 60 % मतदान

November 20, 2008 3:49 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर, छत्तीसगढ छत्तीसगडमध्ये आज दुसर्‍या टप्प्यासाठी 60 टक्के मतदान झालं. एकूण 51 जागांसाठी मतदान झालं. आजच्या निवडणूक रिंगणामध्ये माजी मुख्यमंत्री अजित जोगीही होते. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या बिलासपूर जिल्ह्यातील मारवाही इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जोगी या हल्ल्यातून वाचले, याप्रकरणी बिलासपूर पोलिसांनी 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरी भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली तसंच यावेळी महिलांनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला.

close