राज ठाकरे जरा जपून बोला !

January 23, 2012 6:25 PM0 commentsViews: 2

23 जानेवारी

निवडणूक आयोग काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करते आणि या आयोगाचे का लोणचं घालायचं का ? अशा शब्दात थेट हल्ला राज ठाकरे यांनी आयोगावर चढवला. राज यांच्या या विधानावर आक्षेप घेतं आयोगाना पहिल्यांदा राज यांना समज दिला. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. तेव्हा त्यांची अवहेलना करु नका अशी समज निवडणूक आयोगाने राज ठाकरेंना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयोगाने आचारसंहिता प्रकरणी क्लीन चीट दिल्यानंतर राज यांनी आयोगावर टीका केली. उद्या जर मी अशी चूक करुन माफी मागीतली तर आयोग मला सोडेल का ? आयोगाने अजितदादांना सोडलंच कसं ? अशा आयोगाचं काय लोणचं घालायचं का ? अशा शब्दात राज यांनी टीका केली. राज यांच्या टीकेच्या विरोधात भाजपने आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगानेही राज यांच्यावर कारवाई करणार असल्याची चर्चा होती. मात्र यावेळी आयोगाने पहिल्यांदा राज यांनी समज दिली. जर पुन्हा एकदा राज यांनी टीका केली तर आयोग कडक कारवाई करु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

close