अण्णा पाहणार ‘गली गली चोर है’ सिनेमा

January 23, 2012 11:50 AM0 commentsViews: 4

23 जानेवारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पाहणार आहेत एक बॉलिवूड फिल्म. पण हा कोणताही मसाला चित्रपट नसून त्यांच्याच लढ्यावर आधारित 'गली गली चोर है' हा चित्रपट आहे. नितीन मनमोहन या चित्रपटाचे निर्माता असून या चित्रपटात अक्षय खन्ना, राजपाल यादव, श्रेया सरण आणि मुग्धा गोडसे असे कलाकार आहेत. अण्णांनी हा चित्रपट पहावा अशी विनंती गली गली च्या टीमनं केली होती. त्याला अण्णांनी होकार दिल्यानंतर आता उद्या हा चित्रपट राळेगणमध्ये दाखवला जाणार आहे. राळेगणमध्ये सिनेमा हॉल अथवा ऑडिटोरियम नसल्यामुळे चित्रपटाचे निर्मातेच स्क्रीन, प्रोजेक्टर आणि साऊंड सिस्टीम सोबत नेणार आहेत.

close