रेल्वेचं भाडं 25 टक्काने वाढण्याची शक्यता

January 23, 2012 12:01 PM0 commentsViews: 4

23 जानेवारी

रेल्वे आधुनिकरण समितीने पॅसेंजर भाड्यामध्ये 25 टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. सॅम पित्रोदा यांच्या अध्यतेखालील उच्च स्तरीय समितीने या शिफारसी सुचवल्या आहेत. भाडेवाढ झाल्यास पुढच्या वर्षअखेर 60 हजार कोटी रुपयांचा निधी रेल्वे गोळा करु शकेल. रेल्वे बजेटपूर्वी योजना आयोगापुढे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. रेल्वेचं आधुनिकरण करण्याच्या कामी हा निधी वापरता येईल. प्रवासी भाड्यात वाढ केल्यास 37,500 कोटी रुपयांचा निधी गोळा होईल. रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी गेल्या वर्षी या समितीची स्थापना केली होती.

या समितीत दीपक पारेख, राजीव लाल हे सदस्य आहेत. या शिवाय मालवाहतुकीच्या दरात वाढ करुन 25 हजार कोटी रुपयाचा निधी जमा होऊ शकतो. अजूनही काही शिफारसी या समितीने केल्या आहेत. रेल्वेच्या मालकीच्या जागा व्यावसायिककामासाठी वापरल्यास यातून 50 हजार कोटींचा महसूल मिळू शकतो. सोबतच ऑपरेटिंग कॉस्ट कमी करून त्यातून 15 हजार कोटींची बचत होऊ शकते. मालवाहतुकीचा महसूलात वाढ करुन 40 हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवावं आणि सरकारी आणि खाजगी भागीदारीतून 1 लाख 79 कोटी रुपये जमवता येतील असंही या समितीनं सांगितलं आहे.

close