पंतप्रधानही आता ट्विटरवर !

January 24, 2012 9:34 AM0 commentsViews: 1

24 जानेवारी

सोशल नेटवर्किंग साईट वापरणार्‍यांमध्ये आता आणखी एक महात्वाचे नाव आता सहभागी होतंय आणि हे आहे पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ.पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान कार्यालय आता ट्विटरवरही आलं आहे. पत्रकार पंकज पचौरी हे आता पीएमओ (PMO)त माध्यम सल्लागार म्हणून आल्यानंतरच हे पहिलं पाऊल आहे. सध्या या साईटवर आता शौर्य पुरस्कारांसंदर्भातील ट्विट दिसत आहे. पंतप्रधान कार्यालय हे लोकांच्याकक्षेत येतं आणि म्हणूनच सरकार हे लोकांच्या हितासाठीच प्रयत्न करत असल्याच लोकांना कळलं पाहिजे. येत्या काळात पंतप्रधानांच्या आगामी कार्यक्रमांची माहितीही ट्विटरवर मिळेल असं सूत्रांनी सांगितलं.

close