जि.प.साठी अर्जाची मुदत संपली, नेत्यांनी कंबर कसली !

January 23, 2012 2:52 PM0 commentsViews:

23 जानेवारी

राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांसाठी फॉर्म भरण्याची आजची शेवटची मुदत होती. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या गटांनी फॉर्म भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. आज सकाळपासूनच राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळली. इच्छुक उमेदवार, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावरच मुक्काम ठोकल्याने राजकारण्याची जत्राचं भरल्याचं दृश्य जिकडे तिकडे दिसतं होतं. गटातटांच्या राजकारणाला आता उमेदवारी निश्चित झाल्यापासून आणखी जोर येणार आहे. जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरच्या निवडणुका असल्या, तरी कस मात्र आमदार खासदारांचा आणि बड्या नेत्यांचा लागणार आहे.

close