डिलाईट जहाजाचं समुद्री चाच्यांकडून अपहरण

November 20, 2008 3:52 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर, समुद्र चाच्यांनी आज आणखी एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलंय. डिलाईट नावाच्या या जहाजावरून गव्हाची वाहतूक केली जात होती. त्यावर 25 जणांचं पथक कार्यरत होतं. त्यापैकी 7 जण भारतीय आहेत. मुंबईतील एका कंपनीकडून ही गव्हाची वाहतूक केली जात होती. राजदीप देहरा, अब्दुल जब्बार, क्लाईव्ह फर्नांडिस, मोहम्मद अस्लम आणि इतर तिघांचं या जहाजावर समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावरील सर्वजण सुरक्षित आहेत.

close