अ ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

January 24, 2012 9:58 AM0 commentsViews:

24 जानेवारी

ऍडलेड टेस्टमध्ये भारतीय टीमची सुरुवात कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही खेळ भारताच्या हातातून निसटलाय. आणि त्याला कारण ठरले ऑस्ट्रेलियाचे क्लार्क आणि पाँटिंग हे आजी माजी कॅप्टन…तीन विकेटवर 84 रन या स्कोअरपासून त्यांची जोडी जमली. आणि त्यानंतर पुढची दोन सेशन त्यांनी बिनदिक्कत खेळून काढली. अडीचशे रनची पार्टनरशिप तर त्यांनी केली. शिवाय ऑस्ट्रेलियाला दिवसअखेर 335 रनवर 3 विकेट असा भक्कम स्कोअर उभारून दिला. पाँटिंगने आपली 41वी टेस्ट सेंच्युरी ठोकली. आणि त्याचबरोबर तेरा हजार रनचा टप्पाही ओलांडला. दुसर्‍या बाजूने क्लार्कनेही आपली 17वी सेंच्युरी पूर्ण केली. दिवस अखेर पाँटिंग 137 तर क्लार्क 140 रनवर खेळत आहे. त्यापूर्वी कॉवन 30, वॉर्नर 8 आणि मार्श 3 रनवर आऊट झाले. भारतातर्फे झहीरने 1 तर अश्विनने 2 विकेट घेतल्या.

close