पुण्यात महायुतीचं जमलं; भाजप 89,सेनेला 63 जागा

January 24, 2012 12:46 PM0 commentsViews: 2

24 जानेवारी

पुण्यातला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यात भाजपला 89, तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर रिपब्लिकन पक्षाला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातल्या काही जागा रिपाइंला देणार आहेत. महायुतीसंदर्भातली अधिकृत घोषणा पुण्यातच केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

close