सरकारविरोधात मतदान करण्याचा गिरणी कामगाराचा पवित्रा

January 24, 2012 12:31 PM0 commentsViews: 3

24 जानेवारी

गिरणी कामागारांच्या ऐतिहासिक लढ्याला मागील आठवड्यात तीस वर्ष पूर्ण झाली. आठवडा उलटत नाही तोच पुन्हा एकदा गिरणी कामगारांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. 'हक्काची घरं मिळालीच पाहिजे' या मागणीसाठी गिरणी कामगारांनी आज आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला. मोठ्या संख्येने गिरणी कामगार यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकार विरोधात आम्ही मतदान करणार असून आमची ताकद काय आहे हे आम्ही राज्यसरकारला दाखवणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिला.

close