मानसी देशपांडे हत्याप्रकरणी आरोपी टिंगर्‍याला जन्मठेप

January 24, 2012 1:26 PM0 commentsViews: 28

24 जानेवारी

राज्यभरात गाजलेल्या औरंगाबादच्या मानसी देशपांडे बलात्कार आणि हत्याप्रकरणी मुख्य आरोपी टिंगर्‍या ऊर्फ जावेद खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अन्या दोन आरोपींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे त्यांना 1 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 12 जून 2009 रोजी औरंगाबादच्या अहिंसानगर परिसरातील मानसीच्या घरामध्ये बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. सलग 3 वर्ष यावर सुनावणी झाल्यानंतर आज कोर्टान ही शिक्षा सुनावली आहे.

close