नाशिकमध्ये 69 जणांना तडीपारीची नोटीस

January 25, 2012 10:35 AM0 commentsViews: 2

25 जानेवारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी सध्या धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी 69 जणांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकार्‍यांचा सहभाग असल्याने राजकीय पक्षांमधील गुन्हेगारांचा सहभाग पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. तर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 400 गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गाड्या जाळण्याच्या घटना पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष वभैव गोवर्धने, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, सुरेश मारू, सुहास कांदे यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

close