सामान्य महिला उमेदवारांना तिकीट मिळणार का ?

January 24, 2012 3:13 PM0 commentsViews: 1

अलका धुपकर,मुंबई

24 जानेवारी

महिलांना यंदाच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षण मिळालं आहे. याआधी 33 टक्के असलेलं आरक्षण 17 टक्क्यांनी वाढवल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिला उमेदवार मिळतील का ? अशी भिती होती. प्रत्यक्षात उमेदवारीसाठी अनेक महिला इच्छुक आहेत. पण राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या कुटुंबातल्या महिलांची संख्या पाहता, सामान्य महिला उमेदवारांना तिकीट मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर पश्चिम विभागासाठीच्या मुलाखतींना आलेल्या महिला उमेदवारांना आम्ही गाठलं. कुणी अस्सल समाजकार्य करणारी तर कोणी राजकारणात सक्रीय असणारी तर, कुणी बिचकत बोलणारं आणि राजकीय ओढीपेक्षा…नवरा राष्ट्रवादीत पदाधिकारी असल्यामुळे मुलाखतीला आलेली. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 58 जागांपैकी 33 जागा या महिलांसाठीच्या राखीव आहेत आणि दोन जागांवर खुल्या गटातून महिला उमेदवार असणार आहेत. तळमळीनं समाजकारण करणार्‍या महिलांनाही आरक्षण ही राजकीय प्रवेशाची संधी वाटतेय.

close