चंद्रपुरात पट्टेदार वाघाची शॉक देऊन शिकार

January 24, 2012 3:24 PM0 commentsViews: 8

24 जानेवारी

चंद्रपूरातील मध्य चंदा वन विकास महामंडळ बल्लारपूर अंतर्गत येणार्‍या जंगलात एका पट्टेदार वाघाला वीजेचा शॉक देऊन शिकार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं वनविभागात एकच गोंधळ उडला आहे. जरान विभागाच्या गेट नं. 122 जाणार्‍या विजेच्या तारा खाली वाघाचा मृत्यूदेह आढळला आहेत आणि मृत झालेल्या वाघाच्या नखासह वाघाच्या शरीरातील अनेक भाग गायब असल्याने ही वाघाची शिकार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे वाघ वाचवा यासाठी देशभरात मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे पण दुसरीकडे वाघांची होत असलेल्या शिकारीमुळे पर्यावरणवाद्यांमध्ये संतप्त भावना उमटत आहे.

close