औरंगाबादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू

November 20, 2008 6:06 PM0 commentsViews: 123

20 नोव्हेंबर, औरंगाबाद औरंगाबादमध्ये बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि टर्मिनल सुरू झालंय. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, खासदार विजय दर्डा आणि आमदार राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी तेलाचे दर कमी झाल्यामुळे तिकीटाचे दर कमी होतील तसंच राज्यांनीही सेल्स टॅक्स कमी करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय.तब्बल 100 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या विमानतळावर सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरात उभारण्यात आलेलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मराठवाड्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील विमानतळात 9 हजार फुटांची धावपट्टी असल्यामुळे एअरबस-300 सारखी विमानंही याठिकाणी उतरु शकतील. सिंगापूर विमानतळाच्या धर्तीवर एक वेगळा लुक असलेलं नवं टर्मिनल 20 हजार 500 स्क्वेअर मीटर जागेत उभारण्यात आलंय.

close