राष्ट्रवादीत आणखी एका गुंडाचा प्रवेश

January 24, 2012 4:46 PM0 commentsViews: 143

24 जानेवारी

गुंड रवी पाटीलनंतर आता आणखी एका गुंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरुर तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभुमीचे मंगलदास बांदल हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती होस्टेल इथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बांदल यांनी कालच जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारी अर्ज भरला होता. बांदल यांच्यावर सध्या ऍट्रासिटी आणि वीज चोरीचा गुन्हा आहे. पूर्वी पैलवान असलेल्या मंगलदास बांदल यांच्यावर दहशत माजवणे, धमकावणे, गुंडगिरी करणे असे गंभीर गुन्हे होते. या गुन्ह्यातून त्यांची सुटका झाली आहे. बांदल यांचे नाव तडीपार गुंडांच्या यादीतही होते. 2010 साली त्यांची तडीपारी रद्द झाली होती. त्यांनी 2009 मध्ये शिरुर विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवली होती. सध्या ते शिरुर बाजार समितीचे अध्यक्ष आहेत.

close