नॉर्वेतील दोन चिमुकली मुलं काकांच्या ताब्यात

January 25, 2012 4:04 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

नॉर्वे पोलिसांच्या ताब्यात असलेली दोन चिमुकली मुलं अखेर आपल्या कुटुंबीयांकडे परत जाणार आहेत. ओस्लो शहरात राहणारे अनुरुप आणि सागरिका भट्टाचार्य याांच्या दोन मुलांचा ताबा त्यांच्या काकांना मिळणार आहे. त्यासाठी ओस्लोची चाईल्ड वेलफेअर एजंसी आणि भट्टाचार्य कुटुंबीयांमध्ये एक करार होणार आहे. या करारानुसार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी यापुढे त्यांच्या काकांची असेल. पण मुलांच्या आई-वडीलांना कधीही आपल्या मुलांना भेटता येईल. अनुरुप आणि सागरिका आपल्या मुलांना हाताने जेवण भरवतात, त्यांना आपल्यासोबतच झोपवतात. हे नॉर्वे सरकारच्या नियमांनुसार चुकीचं असल्याचं सांगत भट्टाचार्य पती-पत्नींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन लहान मुलांना एका डे केअर सेंटरच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी नॉर्वे सरकारशी चर्चा केली. अखेर या मुलांना त्यांच्या काकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.

close