13/7 बॉम्बस्फोटावरुन एटीएस-केंद्रीय गृहमंत्रालयात मतभेद

January 24, 2012 5:36 PM0 commentsViews: 3

24 जानेवारी

13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं पुन्हा समोर आलं आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय हे मुंबई एटीएस आणि दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागणार आहे. पण तपास यंत्रणांमध्ये कुठलाही मतभेद नसल्याचं गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे.

दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस यामध्ये गेले काही दिवस चाललेल्या शीतयुद्धानंतर शेवटीगृह मंत्रालयाने एटीएसची थिएरी मान्य केली. आणि 13/ 7 च्या केसचा उलगडा झाल्याचं जाहीर करण्यात आलं. केंद्रीय गृहसचिवांनी असं स्पष्ट केलं की, प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस करत असलेला तपास योग्य मार्गावर आहे.

नकी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलबरोबर मदत करण्यासाठी मुंबईला गेला होता असं त्याच्या कुटंुबीयांनीही सांगितलं. पण त्याचा स्फोटाशी काहीही संबंध नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

दिल्ली पोलिसांसोबतचा वाद आणि या प्रकरणातली नकी अहमदची अटक हा त्यांच्यासाठी संपलेला मुद्दा आहे, असं एटीएसनं स्पष्ट केलं.पण जर्मन बेकरी आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसचा सुरुवातीचा तपास चुकीच्या दिशेनं गेला होता. आणि याबद्दलचा मुंबईतल्या मंत्रालयातील अधिकारी आणि नाएडाचे अधिकारी यांच्यातला आत्मविश्वास पुन्हा मिळवणं हे खरं आव्हान आहे.

गृहसचिवांनी महाराष्ट्र एटीएसचं अभिनंदन केलंय. पण तरीही हा वाद संपलेला नाही. दिल्ली पोलीस आणि मंुबई एटीएस दोघांनाही नक्की काय झालं होतं याबद्दलचा अहवाल सादर करायला सांगितलं आहे.त्यानंतरच 13/7 प्रकरणी खर्‍या आरोपींना अटक झाली का हे स्पष्ट होऊ शकेल.

close