कचर्‍याच्या पैशातून गरिबांसाठी टीव्ही

November 21, 2008 10:21 AM0 commentsViews: 4

21 नोव्हेंबर, मुंबईराम जगतापएकेकाळी अपूर्वाई असलेला टीव्ही आता अगदीच सामान्य होऊन गेलाय, पण रस्त्यावरचे भिकारी, कचरा वेचणारे, हॉटेलात काम करणारी अल्पवयीन मुलं यांच्यासाठी ती अजूनही मोठी अवघड गोष्ट आहे. पण यावर मार्ग काढलाय मुंबईतल्याच एका कचरा वेचणार्‍या बाप-लेकांनी. त्यांनी कचराच्या पैशातून चक्क टीव्ही विकत घेतला आहे. पण स्वत:साठी नाही तर इतरांसाठी !जॉय आणि त्याचे वडील या भागात खूप फेमस आहेत ते त्यांच्या टिव्हीमुळे. जॉयच्या वडलांनी म्हणजे अण्णानं जॉय वाईट वळणाला लागू नये म्हणून हा टीव्ही घेतला. तोही परवडत नसताना. पण अण्णाची ही सगळी खटपट एकट्या जॉय साठी नाही. जॉय सांगतो 'मला एकट्याला टीव्ही बघायला आवडत नाही. आमच्या आजूबाजूला बरेच गरीब लोक आहेत. त्यांना टीव्ही बघून आनंद मिळतो. आम्ही एकत्र टीव्ही बघतो. त्यात खरी मजा आहे.'पण जॉय, अण्णा आणि त्यांच्या मित्रांना खरा शौक आहे क्रिकेटचा. अण्णा सांगतात 'मला क्रिकेट खेळायला आवडत नाही, पण बघायला आवडतं. इकडे बसून सगळ्यांबरोबर क्रिकेट बघण्यात जी मजा आहे, ती इतर कशात नाही.'अण्णानं आता डीव्हीडी प्लेअरही घेतलाय त्यावर तो आपल्या मित्रांना नवनवे सिनेमेही दाखवतो. कस्टम हाऊसजवळचं हे ओपन थिएटर रात्री आठला सुरू होतं आणि बंद होतं रात्री बाराला. तेही गेली आठ वर्ष! तुम्हालाही अणाच्या या ओपन थिएटरमध्ये नवा सिनेमा पाहायचा असेल, तर तुम्ही रात्री आठच्या शोला जरूर येऊ शकता.

close