लोकपालसाठी अण्णांनी फुंकले पुन्हा रणशिंग

January 26, 2012 8:48 AM0 commentsViews: 1

26 जानेवारी

जनलोकपालच्या लढ्यासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. जनलोकपाल विधेयक जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं. आपली तब्येत आता सुधारली असून शक्यतो पुढच्या महिन्यापासून आपण भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी देशभर दौरा करणार असल्याचंही अण्णांनी जाहीर केलं. 2012 ते 2014 पर्यत संपुर्ण देशात फिरुन जनजागृती करणार आणि 2014 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जनलोकपालसाठी आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितले. यावेळी अभिनेते अनुपम खेर यांचीही खास उपस्थिती होती.

close