राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2012 7:43 AM0 commentsViews: 8

26 जानेवारी

63 व्या प्रजासत्ताक दिनाचा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये पार पडला राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच राज्यातल्या पोलीस आणि अर्धसैनिक दलांच्या परेडने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतीक दृष्ट्या अधिकाधिक प्रगतीवर नेण्याचा मनोदय राज्यपालांनी व्यक्त केला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्री मंडळातील काही सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्येही नाशिकचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस परेड मैदानावर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. नाशिक शहर आणि जिल्हा पोलिस दल, होमगार्डस्, श्वान पथक, शीघ्र कृती दल यांच्या शानदार संचलनासह हा सोहळा संपन्न झाला. नाशिकमधल्या सर्व खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक प्रजासत्ताकदिनाच्या या सोहळ्याला उपस्थित होते.

close